Breaking News

युवकांनी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका समजून घ्यावी : पत्रकार परिषदेत निलेश विश्वकर्मा यांचे प्रतिपादन


बीड :  वंचितांचे प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर युवकांनी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका समजून घेणे म्हत्वाचे असल्याचे मत वंचित बहूजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले. तर अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिशी युवकांची मोठी फळी निर्माण करण्यासाठी आम्ही जिवाचे रान करीत आहोत, असल्याचे मत वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी व्यक्त केले.

वंचित बहूजन आघाडीकडून आयोजित केलेल्या युवा संवाद परिषदनिमित्त बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना विश्वकर्मा बोलत होते.यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर, वंचितचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, वंचितचे महासचिव राजेंद्र पातोडे, बीड जिल्हा निरीक्षक अक्षय बनसोडे,  वंचितचे राज्य महासचिव अनिल जाधव, अरूण जाधव यांची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत बोलताना निलेश विश्वकर्मा म्हणाले की, विषमतावादी विचारधारेचे लोक सत्तेत जावून बसले आहेत. परिणामी जनतेच्या वाटोळ्याचे कायदे पारित होत आहेत.तसेच वंचितांच्या न्यायासाठी त्यांची राजकीय ताकद वाढविली पाहिजे.ग्रामपंचायतच्या निवडणूका वंचित आघाडी पूर्ण ताकदीने लढवित आहे. शोषण पक्षांची खेळी वंचित बहुजन वर्गाने समजून घेतली पाहिजे. कुठल्याही गोष्टीला कोरोनाचे कारण सांगत, शेतकर्‍यांसह सामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे.अशा परिस्थितीत अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर सर्वसामान्य वंचित माणसांचे प्रश्न घेवून एकटेच लढा देत आहेत.त्यामुळे आंबेडकर यांची राजकीय परिवर्तनाची भूमिका युवकांनी निट समजून घेतली पाहिजे. असे आवाहन निलेश विश्वकर्मा यांनी युवकांना केले. यावेळी युवा संवाद परिषदेचे संयोजक किरण वाघमारे, प्रा.राजेंद्र कोरडे, खालेद फारुकी, विश्वजित डोंगरे, सचिन मेघडंबर आदींची उपस्थिती होती.
No comments