Breaking News

'त्या' नरभक्षक बिबट्याबाबत वनमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा ; इतर बिबाट्यांना ञास देणे अयोग्य - आ. सुरेश धस


के. के. निकाळजे । आष्टी

औरंगाबाद, अहमदनगर, बीड,सोलापूर या चार जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकुळ घातला असून आतापर्यंत ९ जणांचे बळी घेतले आहे.या सर्व ठिकाणी हल्ला करणारा तो एकच बिबट असल्याचे स्पष्ट चित्र आहे.यामुळे या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पदवीधर निवडणुका संपल्या आहेत.आत्ता तरी वनमंञी संजय राठोड यांनी जागे व्हावे,सोलापूर भागात नरभक्षक बिबटयाचा शिरकाव झाला आहे. हे क्षेत्र ऊस व दाट लोकवस्तीचा भाग असल्याने बिबट्याबाबत तातडीने निर्णय घेऊन या ठिकाणी ठाण मांडून त्याला जेरबंद करण्याची  मागणी प्रसिद्धी पञकाद्वारे भाजपा आ.सुरेश धस यांनी केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पञकात आ.धस यांनी पैठण,पाथर्डी,आष्टी आणि करमाळा या तालुक्यातील एकूण ९ शेतकऱ्याचा बळी घेणारा बिबट हा एकच आहे.मच्छिंद्र नाथ गडाच्या पायथ्याशी २०१२ पासून गेल्या ९ वर्षापासून बिबट्यांचे या भागात वास्तव्य आहे .मात्र यापूर्वी एकाही बिबटयाने कुठल्याही नागरिकांवर हल्ला केला नाही.शिरापूर येथे देखील एक वर्षांपासून बिबट्याची जोडी वास्तव्यास आहे.त्यांनीही कोणावरही हल्ला केलेला नाही.आपला काही भाग डोंगराळ असल्याने हळूहळू बिबट्याची संख्या वाढत गेली आहे.जवळपास आपल्या भागात २१ ते २२ बिबट असल्याचा अंदाज आहे. बिबटची  संख्या वाढल्याने रानडुक्करांची संख्या कमी झाली आहे.यामुळे रानडुक्कराबाबत च्या शेतकऱ्यांच्या तक्रारी बंद झाल्या आहे. शिवाय तो दुसरे वन्यप्राणी देखील खातोय. बिबट हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून उलट मित्र आहे.मध्यंतरी रानडुकरांनी शेतक-यांच्या पिकांचे आतोनात नुकसान चालविलेले होते माञ अशावेळी हे बिबटेच शेतक-यांचे मिञ बनले होते.माञ सद्यस्थितीत जो बिबट्या नरभक्षक झालेला आहे.तो बिबट्या आपल्या भागात कोठून आणि कसा आला याचा तपास वनविभागाने लावणे गरजेचे असून शिवाय या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त लावणे देखील आता गरजेचे बनले असल्याने वनमंञ्यांनी याबाबत ठोस पावले उचलून त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे अन्यथा तो आणखी बळी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान,सध्या शेतकऱ्यांनी शेतात काम करताना गळ्यात मफलर, खुरपणी करताना महिलांनी गळ्यात स्कार्फ वापरावे.मढी शिवारात वनविभागाने पकडलेल्या बिबट्यांना जास्त काळ पिंजऱ्यात ठेवणे म्हणजे त्यांचा  रागीटपणा वाढतो त्यामुळे या पकडलेल्या बिबट्यांची DNA चाचणी लवकर करावी.आणि ज्याने मानवी हल्ले केले आहेत तो नरभक्षक बिबट हा एकचा असून यामुळे इतर बिबट्यांना नागरिकांनी ञास देणे योग्य नसल्याचेही आ.सुरेश धस यांनी म्हटले आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने हा नरभक्षक बिबट्या गेला असल्याने साखर कारखाने या भागात आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचे ऊसतोड मजूर काम करत आहेत.त्यामुळे आता मजूरांनी देखील सतर्क राहूनच काम करणे गरजेचे असल्याचेही आ.धस यावेळी म्हणाले.


No comments