Breaking News

"अडीअडचणी कळवा आणि उत्तर मिळवा," जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संघटनेचा उपक्रम - राजेंद्र लाड


के. के. निकाळजे । आष्टी  

शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड च्या वतीने दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मात्र यावर्षी कोरोना संक्रमणाचा काळ असल्याने दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा बीड च्या वतीने व्हाॕटसअप व भ्रमणध्वनीद्वारे ३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत खाली नमुद केलेल्या भ्रमणध्वनीवर बीड जिल्ह्यातील व राज्यातील दिव्यांग बंधू - भगिनींनी "अडीअडचणी कळवा आणि उत्तर मिळवा" या उपक्रमात सहभागी होवून आपल्या समस्या व अडीअडचणी मांडाव्यात व उत्तर मिळवून घ्यावे असे आवाहन शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी केले आहे.

      

बीड जिल्ह्यातील व राज्यातील दिव्यांग सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग कर्मचारी,दिव्यांग विद्यार्थी,दिव्यांग जेष्ठ नागरिक,दिव्यांग मुलांचे पालक यांनी दिव्यांगत्वा विषयी व दिव्यांगांसाठी असलेल्या विविध लाभाच्या योजना विषयी तसेच विविध कार्यालयातील आपल्या प्रतिक्षेत असलेल्या कार्यालयीन कामकाजाविषयी बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड - ९४२३१७०८८५ / ८६६८४७९१९२ व राज्यउपाध्यक्ष महादेव सरवदे - ८६६९०५४१०५ यांच्या भ्रमणध्वनीवर काँल करुन अथवा व्हाॕटसअप च्या माध्यमातून आपले प्रश्न,अडीअडचणी,समस्या दि.३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत विचाराव्यात.आपल्या अडीअडचणी व समस्यांचे उत्तर आपणांस लगेचच देण्यात येवून आपल्या प्रश्नांचे निराकरण केले जाईल.तसेच जेथे योग्य असेल तेथे आपल्या पाठीशी संघटना खंबीरपणे उभी राहून आपल्या अडीअडचणी व समस्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी पाठपुरावा करील. तसेच यावर्षी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमावरील खर्च वाचणार असून या खर्चातून दिव्यांग संघटनेच्या सभासद बांधवांनी आपल्या भागातील गरीब,होतकरु दिव्यांग विद्यार्थी बांधवांना शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत करावी.असेही आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

       

तरी बीड जिल्ह्यातील व राज्यातील दिव्यांग बांधवांनी "अडीअडचणी कळवा व उत्तर मिळवा" या उपक्रमाचा लाभ घेवून आपल्या अडीअडचणी व समस्या मांडाव्यात तसेच ३ डिसेंबर २०२० रोजी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने बीड जिल्हास्तरीय सर्व कार्यालयात इमेलद्वारे दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.असेही शेवटी दिव्यांग संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी सांगितले आहे.


No comments