Breaking News

शेतमजूराचा मुलगा शिशिकांत भोसलेचे "एमबीबीएस" होण्याचे स्वप्न होणार साकार


धुनकवाडचा दुसरा एमबीबीएस डॉक्टर होणार

 

जगदीश गोरे । बीड 

धारुर तालुक्यातील धुनकवाड येथील शेतीत काम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणारे  शेतमजूर अशोक बाबासाहेब भोसले यांचा मुलगा शिशिकांत अशोक भोसले यानी निट परिक्षेत त्याने 572 गुण घेतले असून गव्हरमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया येथे त्याचा एमबीबीएसला नंबर लागला असुन आता त्याचे एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार असल्याने त्यांच्या कुटुंबासह ग्रामस्थांना अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब असून धुनकवाड येथील दुसरा एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. आमच्या गावचे जेष्ठ पत्रकार तथा भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांची मुलगी डॉ.साक्षी कुलकर्णी ही पहिली एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.

       


   

धुनकवाड ह्या गावाची धार्मिक गाव म्हणुन ओळख कुंडलीका धरणाच्या काठावर वसलेले आहे चोहबाजुनी डोंगर येथील लोकांच्या जमिनी कुंडलीचा धरणात गेल्याने अनेक शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत तर काही भुमिहीन झाले आहेत तर काही शेतमजुरी करुन तर काही परराज्यात जाऊन ऊसतोड मजूरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात आशा हलाकीच्या परिस्थितीत आई-वडील अशिक्षित असुन सुद्धा आपल्या मुलावर शिक्षणाचे संस्कार घडवुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी आदर्श निर्माण केला आहे.अशा डोंगराळ भागातून जाऊन स्वत:च्या हिमतीवर, मेहनत, जिद्द, चिकाटीवर शिशिकांतने हे शिखर गाठले असुन हा गावतील दुसरा एमबीबीएस डॉक्टर होणार आहे. शिशिकांत हा डोंगरपट्ट्यातील धारुर तालुक्यातील धुनकवाड या गावचे भुमिपुत्र असल्याने त्याचा गावाला अभिमान आहे.डोंगरपट्यासह तालुक्यातुन या विद्यार्थ्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


No comments