Breaking News

धारूर-भोगलवाडी बससेवा पुर्वरत चालु करा : माजी सभापती अर्जुन तिडके


जगदीश गोरे । धारूर

लाॅकडाऊन काळात बंद करण्यात आलेली धारूर ते भोगलवाडी बससेवा आता एस.टी.महामंडळाने पुर्वरत चालु करून विद्यार्थी व प्रवासी  यांची होणारी गैरसोय दुर करावी. अशी मागणी धारूर पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन तिडके यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे. 

        

यासंदर्भात धारूर पंचायत समिती माजी सभापती अर्जुन तिडके यांनी एस.टी.महामंडळ  धारूर आगार प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गत मार्च महिन्यात उदभवलेल्या कोरोना व्हायरस रोगाच्या पार्श्वभुमीवर देशभरात लाॅकडाऊन करून संचारबंदी लागु करण्यात आली होती. त्यामुळे सर्व वाहतुक,शाळा, महाविद्यालय व इतर व्यवसाय बंद होते.यामुळे गेल्या काही वर्षापासुन चालु असलेली धारूर ते भोगलवाडी ही बससेवा ही बंद करण्यात आली होती. माञ आता हळुहळु सर्व व्यवहार पुर्वपदावर येत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासुन नववी पासुन पुढे बारावी पर्यंत शाळा, महाविद्यालयही चालु झाले आहेत.तरी भोगलवाडी येथील अनेक विद्यार्थी धारूर येथे शिक्षणासाठी जातात.माञ विद्यार्थ्यांना धारूरला ये-जा करण्यासाठी बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांची खुप अडचण होत आहे.तसेच नागरिकांनाही प्रवास करण्यासाठी अडचण येत आहे. तरी धारूर आगार प्रमुख यांनी याची दखल घेऊन तात्काळ धारूर ते भोगलवाडी बससेवा पुर्वरत  चालु करावी. अशी मागणी माजी सभापती अर्जुन तिडके यांनी केली आहे.
No comments