Breaking News

मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त पेठबीडमध्ये रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


डॉ. लक्ष्मण जाधव यांच्या साई सेवा हॉस्पिटलमध्ये शेकडो तरुणांनी केलं रक्तदान

बीड :  लोकनेते केंद्रीय ग्राम विकास मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली. पेठबीड मधील भाजपाचे डॉ. लक्ष्मण जाधव यांनी त्यांच्या साई सेवा हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी स्वयं स्फूर्तीने उत्स्फूर्तपणे सहभागी होवून रक्तदान केलं. 

दरवर्षी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंती निमित्ताने भाजपाचे डॉ. लक्ष्मण जाधव पेठबीड मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून मुंडे साहेबांची जयंती उत्साहात साजरी करतात. यंदा, मात्र कोरोना माहामारीमुळे राज्यातील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे. रुग्णांना ब्लड उपलब्ध व्हावे, म्हणून मुंडे साहेबांच्या जयंती निमित्ताने पंकजाताई व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या आदेशाने डॉ. लक्ष्मण जाधव यांनी त्यांच्या साई सेवा हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 

भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात येऊन रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भगीरथ बियाणी, अनिल चांदणे, विलास बामणे, नागेश पवार यांच्यासह पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील  डॉ. जयश्री बांगर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एफ. आर. इनामदार, नरसिंग मामा, जे. एस. माझफले, ब्रदर रमेज सय्यद यांनी सहकार्य केले. रक्तदान शिबिर मध्ये सकाळ पासूनच तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन रक्तदान केले. No comments