Breaking News

देवकीत दोन सिमेंट बंधारा कामास सुरुवात ; शेतकऱ्यांत समाधान


मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या हस्ते भुमिपूजन ; सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांच्या प्रयत्नातून 42 लाखांचा निधी

गेवराई : जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांच्या प्रयत्नातून गेवराई तालुक्यातील देवकी येथे दोन सिमेंट बंधारा कामांना मंजूरी मिळाली होती. या दोन्ही बंधाऱ्यासाठी 42 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. दरम्यान शुक्रवारी या दोन्ही बंधारा कामाचे उद्धाटन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर बंधारा कामास सुरुवात झाली असून या दोन्ही बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतजमीन ओलिताखाली येण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

    


गेवराई तालुक्यातील रेवकी जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या रेवकी येथे गावाजवळूनच मोठी नदी गेलेली आहे. या नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. त्यामुळे हे पाणी बंधारा करुन अडवल्यास मोठ्या प्रमाणात शेतजमीनी ओलिताखाली येण्यास मदत होईल, तरी याठिकाणी बंधारा करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी या जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांच्याकडे केली होती. त्यानुसार सभापती सविताताई मस्के यांनी मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेत सतत पाठपुरावा करून देवकी येथे लघु पाटबंधारे विभागांतर्गत 30 लक्ष रु. तसेच देवकते वस्ती गायरान येथे जिल्हा परिषद अंतर्गत 12 लक्ष रु. अशा दोन बंधाऱ्यांना मंजुरी आणली होती. यासाठी एकुण 42 लक्ष निधी उपलब्ध झाला होता.

     

दरम्यान या कामाचे भुमिपूजन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते देवकी याठिकाणी शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी 10 वा. सभापती सौ.सविताताई मस्के, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या दोन्ही बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरु करण्यात आले असून दोन्ही बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडवले जाणार आहे. यामुळे परिसरातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होईल असे मा.आ.अमरसिंह पंडित यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. यावेळी सुभाष महाराज नागरे, ऋषिकेश बेदरे, भागवत अष्टेकर, रोहिदास सौंदलकर, गजानन काळे, विलास देवकते, अशोक बोरकर, कमळाजी यमगर, कचरू बाबरे, शेखर मोटे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments