Breaking News

बीडमध्ये बसपाचा सोमवारी मेळावा : खासदार वीरसिंग यांची प्रमुख उपस्थिती, सतिष कापसे यांची माहिती

बीड : बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा  बहन मायावतीजी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता संघटन मेळाव्याचे दिनांक 21 डिसेंबर रोजी   मुक्ता लॉन्स बार्शी रोड बीड येथे दुपारी बारा वाजता आयोजन करण्यात आला असल्याची माहिती बसपाचे जिल्हा प्रभारी सतिष कापसे यांनी पत्रकाद्वारे दिली. 

बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता संघटन बांधणी करता  खासदार वीरसिंग व महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एडवोकेट संदीप ताजणे  यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी रोजी दुपारी बारा वाजता केले आहे. करिता बहुजन समाज पार्टी  बीड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन समाज पार्टी बीड जिल्हा युनिट च्या वतीने  बसपा जिल्हा प्रभारी सतीश कापसे व बसपा जिल्हाध्यक्ष एडवोकेट अमोल डोंगरे यांनी केले आहे.
No comments