Breaking News

अल्पसंख्याक हक्क दिना निमित्त काँग्रेस व तालूका अल्पसंख्याक कल्याण समन्वय समितीने दिले निवेदन

माजलगांव : दर वर्षी राष्ट्रसंघाच्या निर्देशानुसार अल्पसंख्याक हक्क दिन 18 डिसेंबर राबवण्यात आले. अल्पसंख्याक हक्क दिना निमित्त प्रशासनाने अल्पसंख्याकांच्या प्रश्नांची दखल घ्यावे व विविध उपाययोजना करून अंमलात घ्यावे हयासाठी तालूका अल्पसंख्याक कल्याण समन्वय समिती ने माजलगांव तहसीलदार साहेबांना निवेदन दिले. 

              

प्रशासनाने अल्पसंख्याक समाजामध्ये जनजागृती सारखे कालबध्द कार्यक्रम राबवावे व ह्याचा आढावा अहवाल अल्पसंख्याक मंञालयाला पाठवावे तसेच स्थानिक शैक्षणिक समस्यांचा आढावा घेवून अल्पसंख्याक आयोगाला अहवाल पाठवून उपाय सूचवावे तसेच अल्पसंख्याक समाजातील मूली व स्ञी यांना शैक्षणिक जागृती करण्यासाठी उपाययोजना करण्याचा यावे तसेच स्थानिक अल्पसंख्याक दर्जाच्या शाळा सूधारसाठी उपक्रम राबवावे तसेच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण  लवकरात लवकर करावे तसेच जिल्ह्यात शांतता व सलोखा वाढवण्यासाठी अल्पसंख्याक समाजाची समावेश करणारे कार्यक्रम राबवावे तसेच दंगल पिडीतांचे पुनर्वसन करावे तसेच अल्पसंख्याक समाजाची आर्थिक मदत करावे तसेच बॅकांची कर्जे मिळत नाहीत याबाबत उपाययोजना करावे तसेच जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती चे तिमाहीच्या मिटिंग आतापर्यंत का होत नाही हया मिटिंग करण्यात यावे अश्या खूप काही असे प्रश्नांची निवेदन देण्यात आले हयावेळी इम्रान नाईक, काॅग्रेस शहराध्यक्ष शेख रशिद,खमरोद्दिन सिध्दिकी आदि उपस्थित होते.


No comments