Breaking News

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला


बीड :  आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली. या हल्ल्यात महिला किरकोळ जखमी असली तरी ती भयभीत झालेली असून तिच्यावर काकूनाना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती होताच घटनास्थळाकडे वनविभागाचे पथक रवाना झाल्याचे सांगण्यात येते.
No comments