Breaking News

बीड- केज रस्त्यावर कार - दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू


मयतात एक माजी सैनिक तर दोन शेतकऱ्यांचा समावेश

गौतम बचुटे । केज 

केज बीड रोडवरील नांदूर फाटा ते सांगवी सारणी दरम्यान असलेल्या सारुळ पाटीवर एका एक्सयुव्ही कार व मोटारसायकलच्या भीषण अपघातात तिघे ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. मृतांमध्ये एक माजी सैनिकाचा तर दोन शेतकऱ्यांचा समावेश असल्याचं समजते. 


मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दि.२२ डिसेंबर रोजी दुपारी ३:०० वा च्या दरम्यान महेंद्रा एक्सयुव्ही कार व मोटारसायकल मध्ये झालेल्या अपघातात तिघे ठार आहेत.  महेंद्रा एक्स यु व्ही (एमएच-०४/ जीएम२८९ ) ही गाडी कल्याणहून रेणापूरकडे जात असताना मोटार सायकल (एमएच ४४ डी ६६९२) वरून माजी सैनिक सुंदर नामदेव ढाकणे, आप्पाराव बापूराव ढाकणे वय ८० वर्ष , सुंदर नामदेव ढाकणे वय ५३ वर्ष , बहादूर राजाभाऊ पुरी वय ४८ वर्ष सर्व रा. सारुळ मोटार सायकल वरून येत असताना त्यांना एक्स यु व्ही गाडीने जोराची धडक दिली हा अपघात एवढा गंभीर होता की, अपघातात मोटार सायकलचा चकनाचूर झाला असून एक्सयुव्ही गाडी धडक दिल्या नंतर सुमारे दोनशे मीटर अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाली. त्या गाडीतील प्रवाशी देखील किरकोळ जखमी झाले आहेत.  घटना स्थळावर प्रभारी सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस कर्मचारी गुंजाळ, चालक हनुमंत गायकवाड यांनी भेट देऊन माहिती घेतली.


No comments