संभाजी ब्रिगेडच्या परळी शहराध्यक्षपदी शिवश्री सेवकराम जाधव यांची निवड
परळी : संभाजी ब्रिगेड परळी वै. शहर अध्यक्षपदी शिवश्री सेवकराम जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड ची घोडदौड चालू आहे .त्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेडचे बीड पूर्व जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे सर यांच्या सुचनेनुसार व संभाजी ब्रिगेडचे परळी तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यामध्ये परळी वै. शहर अध्यक्षपदी शिवश्री सेवकराम जाधव यांची निवड करण्यात आली.
संभाजी ब्रिगेड नवनिर्वाचित शहराध्यक्ष सेवाकराम जाधव यांच्या कार्याचा त्यांच्या अनुभवाचा येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून येणारी परळी नगर परिषदेची निवडणूक पूर्ण ताकतीने संभाजी ब्रिगेड लढवणार असून त्याच अनुषंगाने मोठ्या जोमाने काम करण्याचा मानस नवनिर्वाचित शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव यांनी व्यक्त केला. या निवडी प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री इंजि. संजय नाना देशमुख मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री अंकुशराव जाधव संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष बाबा इंगळे सामाजिक कार्यकर्ते अरुण दादा सपाटे याप्रसंगी उपस्थित होते. नवनिर्वाचित संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.
No comments