मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी सदस्य नोंदणी करून घ्यावी -जिल्हाउपाध्यक्ष अविनाश कदम
आष्टी : राज्यातील पत्रकारांची अस्मिता असलेल्या मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा शाखेच्या सदस्य नोंदणीस २५ डिसेंबर पासून पारंभ होत असून १५ जानेवारी २०२१ पर्यंत असणार आहे त्यासाठी तालुका संघाचे मजबुतीकरण जिल्हा संघाची रुपरेषा ठरवण्यासाठी परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी व प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, जिल्हाध्यक्ष सुभाष चोरे, विशाल साळुंखे, साहस आदोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील पत्रकार परिषदेत सहभागी होऊन परीषदेचे सदस्य व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी केले आहे.
मराठी पत्रकार परिषद हि राज्यातील पत्रकाराची मोठी आणि एकमेव संघटना असून संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत पत्रकाराचे नेते संघटनेचे आधार स्तंभ एस एम. देशमुख यांनी अनेक पत्रकारांना न्याय दिला अडचणीतील पत्रकारांना मदत केली शिवाय सरकारच्या अगोदर पत्रकारांच्या मदतीला धावणारी संघटना असलेली सर्वात पुढे असलेल्या मराठी पत्रकार परिषदरच्या बीड जिल्ह्यातील सदस्य नोंदणीस २५ डिसेंबर पासून सुरवात होत आहे.
तरी पत्रकारांनी सहभागी होऊन परीषदेचे सदस्य व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी केले आहे.
No comments