Breaking News

आष्टी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अनिरुध्द धर्माधिकारी तर उपाध्यक्षपदी किशोर निकाळजे, सचिवपदी मुजाहिद सय्यद यांची निवड


के. के. निकाळजे । आष्टी 

आष्टी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध अरविंद धर्माधिकारी, तर उपाध्यक्षपदी  किशोर निकाळजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आष्टी प्रेस क्लबची नूतन कार्यकारिणी निवडीसाठी  काल (दि. 21) आष्टी येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. त्यात सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली. आष्टी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे आष्टी तालुका प्रतिनिधी अनिरुद्ध धर्माधिकारी यांची, उपाध्यक्षपदी किशोर निकाळजे व सचिवपदी मुजाहिद सय्यद यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी दिनकर सातपुते, सहसचिवपदी कृष्णा पोकळे, कोषाध्यक्षपदी अनिल मोरे तर प्रसिद्धीप्रमुखपदी रहेमान सय्यद यांची निवड करण्यात आली.  निवडीनंतर नूतन पदाधिकार्यांाचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबर बोडखे, अंकुश तळेकर, बबलू सय्यद, कासम शेख, गोपाल वर्मा, संदीप जाधव, राहूल जाधव, अतुल जवणे, संजय खंडागळे, अशोक तळेकर, सुरेश कांबळे, संतोष ससाणे उपस्थित होते. पदाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी तसेच सामाजिक बांधिलकीतून काम करण्याचा मनोदय नूतन पदाधिकार्यां नी व्यक्त केला.

आष्टी प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांसाठी उपक्रम राबविणार

आष्टी प्रेस क्लबच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या काळात निर्माण झालेली स्थिती पाहता अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे नूतन अध्यक्ष अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी सांगितले.
No comments