Breaking News

प्रभाग क्र १९,२०,२१ मध्ये अटल अमृत पेयजल योजना पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करा - सय्यद इलयास


जिल्हाधिकार्‍यांना दाखवली आजवरच्या निवेदनांची फाईल

बीड :  शहरातील प्रभाग क्रमांक 19, 20, 21 मध्ये अटल अमृत पेयजल योजनेचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करून या प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी एआयएमआयएम यूवा नेता सय्यद इलयास यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

       

निवेदनात नमूद केले आहे की, बीड नगरपरिषदे च्या नगराध्यक्षांनी बीड शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा हवेतच विरली असून गेल्या अनेक वर्षापासून शहरातील प्रभाग क्रमांक 19 20 21 मधील जनता पाण्यासाठी लाहीलाही करीत आहे यामुळे गेल्या पाच वर्षात बीड नगरपालिकेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता आतापर्यंत 16 निवेदने दिली आहेत हे सतरावे निवेदन आहे तरीही बीड नगर परिषद या प्रभागातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष देत नाही. नगरपरिषद शिवाय अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात ही निवेदन दिलेले आहे. परंतु तरीसुद्धा कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. या तिन्ही प्रभागात संबंधित कर्मचारी व अधिकारी यांनी काम न केल्यास त्यांच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ कारवाई करावी. जोपर्यंत अटल अमृत पेयजल योजना चे काम होत नाही तोपर्यंत नगरपरिषद कडून नवीन पाईपलाईन टाकून देण्यात यावी. फुटलेली पाईपलाईन जोडून पाणी पुरवठा करण्यात यावा.

बीड शहरातील नगरपालिकेकडून होत असलेले तिन्ही प्रभागात 19,20, 21 पाणी पुरवठा वेळेवर आणि विनाविलंब होत नसल्याने तसेच कर्मचारी अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे जनतेला पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. बीड नगर परिषदेला 16 निवेदन देऊन व दूरध्वनी क्रमांकावर अनेकदा  विनंती करूनही या तिन्ही प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करत नसल्याने नसल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे  पाण्यासाठी जगावं की मरावं अशी परिस्थिती या तिन्ही प्रभागातील नागरिकांसमोर आलेली आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी या तिन्ही प्रभागात 19, 20 आणि 21 जोपर्यंत अटल अमृत पेयजल योजना चे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नगर परिषद कडून या तिन्ही प्रभागात फुटलेली पाईप लाईन जोडून व जिथपर्यंत नगरपरिषद ची हद्द आहे तिथपर्यंत नवीन पाईप लाईन टाकून देणे. असे आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी द्यावे व संबंधित कर्मचारी आणि अधिकारी वर हलगर्जीपणामुळे काम न केल्यास संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी एआयएमआयएम चे युवा नेते सय्यद इलयास यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अल्पसंख्यांक दिनी  जिल्हाध्यक्षांसह जिल्हाधिकार्‍यांसमोर वाचला तक्रारींचा पाढा!

नुकतेच अल्पसंख्यांक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या प्रभागांच्या पाणी पुरवठा संबंधी बीड नगर परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत दिलेल्या एकूण 16 निवेदनांची तक्रार केली तसेच प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की, गेल्या पाच वर्षात पाणी पुरवठा संबंधी आपल्या कार्यालयात दिलेल्या 16 निवेदनांचे काय केले ? त्यावर काही कारवाई अद्याप पर्यंत का करण्यात आली नाही ? की निवेदन फक्त जनतेकडून घेऊन कार्यालयाकडून रद्दी मध्ये टाकले जाते ? याचे आपण जिल्हाधिकारी या नात्याने उत्तर द्यावे. असा जाब विचारला. यावर जिल्हाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना याप्रकरणी लवकरात लवकर कार्य करण्यास सांगितले. यावेळी ए आय एम आय एम जिल्हाध्यक्ष एडवोकेट शेख शफीक भाऊ   ही उपस्थित होते अशी माहिती सय्यद इलयास यांनी दिली.
No comments