Breaking News

शुक्ल तिर्थ लिमगांव येथे रक्तदान शिबीर संपन्न


तलाठी रुपचंद आभारे यांच्या वाढदिवस निमित्ताने सोन्नाथडी सज्जातील ग्रामस्थांचा उपक्रम

रक्तदान शिबीरात २२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

माजलगाव : तालुक्यातील सोन्नाथडी सज्जाचे तलाठी रूपचंद आभारे यांचा वाढदिवस दरवर्षी विवीध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. यावर्षी देखिल शुल्क तिर्थ लिमगांव येथे रक्तदान शिबीर घेउन साजरा करण्यात आला,यामध्ये २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सोन्नाथडी सज्जाअंतर्गत येणा-या गुंजथडी, शु.ति.लिमगांव व सुरूमगावचे कर्तव्यदक्ष तलाठी आर.एस. आभारे यांच्या ३३ व्या वाढदिवसानिमीत्त २२ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी  तहसिलदार वैशाली पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विरेन भौय्या सोळंके कुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुशील भौय्या डक,जयमहेश साखर कारखान्याचे उपध्याक्ष गिरीश लोखंडे, शुक्लेश्वर देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प.तुकाराम महाराज शास्त्री, बालासाहेब जाधव, पुरूषोत्तम जाधव, सरपंच किसन वगरे,माजी सरपंच भागवत वगरे,ग्रामसेवक रामभाऊ यादव,उदावंत,पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना तहसीलदार वैशाली पाटील म्हणाल्या की, आभारे तलाठी एक उपक्रमशील व्यक्तीमत्व आहे. गावक-यांनी आयोजित केलेल्या या लोकोपयोगी कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. रक्तदान शिबीरासह ३३ वुक्षलागवड करुन विवीध उपक्रमांनी तलाठी आभारे यांचा वाढदिवस साजरा झाल्याने पंचक्रोशीत सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

 सुत्रसंचालन शंकर शिंदे तर आभार प्रकाश चव्हाण यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जालिंदर वगरे,एकनाथ हांडे,बाबा हांडे,रामेश्वर शिंगाडे,योगेश वगरे,लक्ष्मण शिंदे,अतुल चव्हाण, अजय चव्हाण, लिंबाजी शिंदे,मुंजा हांडे,दिपक पंचाळ व समस्त शुक्ल तिर्थ लिमगांव येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


No comments