Breaking News

पवार साहेबांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे - कचरू खळगे


बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

राष्ट्वादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त माजलगाव तालुका राष्ट्वादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात भव्य मोठ्या रक्तदान शिबीराचे आयोजन दि. 12.12.2020 रोजी करण्यात आले असुन यात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्वादी काॅंग्रसचे जिल्हा सरचिटणीस कचरू खळगे यांनी केले आहे.

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने फक्त एक दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे राष्ट्वादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने देशाचे जाणते राजे खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त विवीध कार्यक्रमांचे आयोजन राज्यभर करण्यात आलेले आहे. त्याच पाश्र्वभूमीवर माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका राष्ट्वादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबरोबरच राष्ट्वादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील व जेष्ठ नेते छगनराव भुजबळ, जिल्हाचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व इतर प्रमुख नेते आॅनलाईन पध्दतीने शिबीरास उपस्थित असणार आहेत. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्वादी काॅंग्रसचे जिल्हा सरचिटणीस कचरू खळगे यांनी केले आहे.


No comments