Breaking News

सरपंच पदाबद्दल सस्पेन्स कायम ..!


इच्छुकांना जोर का झटकाच
; १४ हजार ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा उलटफेर करणारा  राज्य सरकारने घेतला निर्णय 

ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची होणार आरक्षण सोडत 

परळी :   तालुक्यातील  90 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 8 डिसेंबर 2020 रोजी तहसील कार्यालयात झाली. परंतु राज्यातल्या 14 हजार ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा उलटफेर करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. ग्रामविकास विभाग मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे गावागावातील ग्रामपंचायतच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले असून गावच्या सरपंच पदाबद्दल सस्पेन्स कायम आहे. 

सरपंच पदावर टपून बसलेल्या इच्छुकांना जोर का झटकाच  बसला आहे. सरपंच होण्याची इच्छा बाळगून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांमध्ये सदरील निर्णयावर नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सदरील निर्णयामुळे अनेक गावच्या राजकारणाचे समीकरण बदलणार असल्याचे राजकीय जाणकारातून बोलले जात आहे. परळी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतसाठी 15 जानेवारी 2020 रोजी मतदान होत आहे.

दि.8 डिसेंबर 2020 रोजी परळी तालुक्यातील 90 ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत घेण्यात आली होती. या पैकी 7 ग्रामपंचायतीचा प्रोग्राम लागला होता. या साठी 15 जानेवारीला मतदान व 18 जानेवरीला मतमोजणी होणार आहे. यामध्ये विविध गावांमध्ये निघालेल्या आरक्षणाच्या अनुसार त्या त्या त्या गावात गावचे पॅनल प्रमुख कंबर कसून उमेदवाराची चाचपणी व निवडीला लागले होते. परंतु आज रोजी शासनाने जाहीर केलेल्या नवीन निर्णयामुळे पॅनल प्रमुखाचे कंबरडे मोडले असून आरक्षण सोडत झाल्याच्या आधारे सरपंच पद निश्चित झाल्यामुळे सर्व गाव पॅनल प्रमुख निश्चिंत होऊन मोठ्या जोमाने उमेदवार चाचपणी व पॅनल जुळवा जुळवीच्या कामाला लागले होते. परंतु नवीन निर्णयामुळे पुढे सरपंच पदाचे आरक्षणाचे काय होईल या टांगत्या तलवारीमुळे गावचा राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली असून पॅनल प्रमुखांसह निवडणूक लढणार्‍या उमेदवारांचा ही उत्साह कमी झाल्याचे दिसत आहे. तर पुन्हा आरक्षण सोडत होणार म्हणून गोधळलेली स्थिती निर्माण झाल्याचे गावा गावात दिसत आहे.

या ग्रामपंचयात साठी होणार मतदान

परळी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी मोहा ग्रामपंचायत असून ही ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षापासून माकपचे नेते कॉ. अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली ताब्यात आहे. मोहा, रेवली, लाडझरी, भोपला, गर्देवाडी, वंजारवाडी, सरफराजपुर या ग्रामपंचायतसाठी येत्या 15 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे.

 

गावनिहाय एकूण मतदार व सदस्य संख्या

1)मोहा:- 4 हजार 474 मतदार, सदस्य संख्या 11

2)रेवली:-2 हजार 474 मतदार, सदस्य 9

3)लाडझरी:-2 हजार 92 मतदार, सदस्य 9

4)गर्देवाडी:- 1 हजार 58 मतदार, सदस्य 07

5)सरफराजपूर:-684 मतदार, सदस्य 07

6)भोपला:- 787 मतदार, सदस्य 07

7)वंजारवाडी:-540 मतदार, सदस्य 07
No comments