Breaking News

‘स्व.रघुनाथराव तांदळे प्रतिष्ठाण’ च्या वतीने परळीत साने गुरूजी कथामाला

परळी वैजनाथ  : साने गुरूजी यांच्या सस्कारक्षम कथावर आधारीत परळीत प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी स्व.रघुनाथराव तांदळे सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने ‘साने गुरूजी’ कथामालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ऍड.अतुल तांदळे यांनी दिली.

साने गुरूजी यांच्या जयंतीचे औच्चीत्य साधुन हा उपक्रम स्व.रघुनाथराव तांदळे सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने वर्षभर परळी शहर व परिसरात राबविण्यात येणार आहे.


साने गुरूजींचे बाल गोपाळावर अतिशय प्रेम होते. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी व त्यांच्या मनाम उव्दात्त जीवनमुल्ये रूजवण्यासाठी साने गुरूजींनी त्यांच्यासाठी छान-छान गोष्टी लिहल्या. त्यांचे ‘श्यामची आई’ हे आत्मकथन महाराष्ट्रातील घरा घरात जाऊन पोहचले आहे. संत ज्ञानेशाची ओवी, संत तुकारामाचा अभंग, मोरोपंताची आर्या तसेच साने गुरूजींच्या गोष्टी मराठी साहित्यात अनंत कालापर्यंंत टिकतील या संस्करक्षम गोष्टींचा लाभ परळी शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना व्हावा हा व्यापक दृष्टीकोण समोर ठेवून ह्या कथामालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्व.रघुनाथराव तांदळे सामाजिक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष ऍड.अतुल तांदळे यांनी दिली.

‘साने गुरूजी कथामाला’ या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध मान्यवर साहित्यीक कथाकरांना निंमत्रीत करण्यात येणर असुन लवकरच या कथामालेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित केला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष ऍड.तांदळे यांनी दिली.
No comments