Breaking News

बीड नगरपालिकेने शहरात तिन दिवसा आड पाणी पुरवठा न केल्यास हंडा बजाओ आंदोलन करणार-अक्षय माने


 बीड :  बीड शहराला पाणीपुरवठा करणारे माजलगाव  व बिंदुसरा धरण पाण्याने भरलेले असताना बीड नगर परिषदे मार्फत बीड शहरात लोकांना दहा ते पंधरा दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. बीड नगर परिषदेच्या आडमुठ्या धोरणामुळे "उशाला नदी आणि घशाला कोरड" अशा प्रकारची दयनीय अवस्था बीड शहरवासीयांची झाली आहे.
 

कोरोनाच्या काळात स्वच्छता राखावी अशा सूचना केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच बीड नगर परिषद देखील वेळोवेळी करत असताना स्वच्छता राखण्यासाठी पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो ही बाब बीड नगर परिषदेला कदाचित माहित नसावी. दहा ते पंधरा दिवसाला पाणी सोडून कोरोनाच्याच्या संकटाला तोंड कसे द्यावे हे बीड नगरपालिकेने बीड शहरातील लोकांना सांगावे.
 वेळोवेळी शिवसंग्रामने बीड नगर परिषदेला निवेदना मार्फत विनंती केली, आंदोलनाचा इशाराही दिला  तरीही बीड नगरपालिकेच्या निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही यामुळे तीन दिवसात पाणी पुरवठ्या बाबत निर्णय न झाल्यास अकरा तारखेला महिला भगिनींना घेऊन शिवसंग्रामच्या वतीने "हंडा बजाओ आंदोलन" करण्यात येणार आहे. असा इशारा शिवसंग्रामचे कार्यकर्ते अक्षय माने यांनी निवेदना मार्फत दिला आहे.

No comments