Breaking News

प्रभाग चार मधील सार्वजनिक शौचालयची उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी केली पाहणी!


 
बीड : शहरातील प्रभाग क्र.4 मधील चांदणे वस्ती येथील सार्वजनिक शौचालयाच्या कामाची पाहणीउपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी करून सदरील काम केली आहे, सदर काम पूर्ण झाले असून परिसरातील नागरिकांना उद्या पासून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. पाहणी करतेवेळी यावेळी अशोक वाघमारे, हनुमंत वाघमारे,नगरसेवक प्रेम चांदणे, पंकज चांदणे,राजू माहुवले,भारत कांबळे ,स्वच्छता निरीक्षक भारत चांदणे, मुकादम पाटूळे आदी यावेळी उपस्थित होते.

बीड शहरातील प्रभाग चार मधील चांदणे वस्ती येथील कामाची पाहणी केल्यानंतर उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी या भागातील नागरिकांशी संवाद साधला, प्रलंबित व नव्याने आनेक विकास कामे हाती घेण्यात येत आहेत. शहरातील विकास कामांचा दर्जा टिकावा यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना केलेल्या आहेत. प्रभाग चार मधील अनेक विकास कामे लवकरच पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

No comments