बजरंग सोनवणे यांच्या हस्ते भाटूंबा येथे ४० लक्ष रुपयाच्या कामांचे भूमिपूजन
गौतम बचुटे । केज
केज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांच्या हस्ते भाटूंबा येथे ४० लक्ष रु. किंमतीच्या कामांचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक १८ डिसेंबर २०२० रोजी संपन्न झाले.
भाटुंबा ता. केज येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती यांच्या प्रयत्नातून आणि जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नवीन ईमारतीचे बांधकाम, संरक्षण भिंत व ईमारती दुरुस्ती बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांच्या शुभ हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधाकर धपाटे होते. तर प्रमुख उपस्थिती गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे, सरपंच सुनील धपाटे हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक चौरे सर यांनी केले. यावेळी ग्रामस्थांनी बजरंग सोनवणे यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर चौरे,प्रकाश चौरे, अभिजित चौरे, मदन तपसे, शिवाजी शिंपले, किशोर थोरात, भागवत सोनवणे, भाऊसाहेब गुंड,राहुल थोरात, संभाजी लोमटे, नवनाथ अंबाड, संदीप करपे, बाळासाहेब जगताप, शाम चटप तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व गावातील नागरिक उपस्थित होते.
No comments