Breaking News

गाढे पिंपळगावात जिओची रेंज गुल; आँनलाईन शिक्षणाचा बट्याबोळ

परळी : तालुक्यातील गाढे पिंपळगाव सह तालुक्यातील अनेक गावात गेल्या काही दिवसांपासून जिओ कंपनीचे नेटवर्क (रेंज) गायब होत असून मोबाईल फोन म्हणजे असून होळंबा नसून खोळंबा झाला असून मोबाईल खेळणे झाले आहे. यामुळे आँनलाईन शिक्षणाचा बोजवारा वाजला आहे. तसेच फोन लावला किंवा आला की..हँलो...हँलो करावे लागत आहे.

              

गाढे पिंपळगावसह तालुक्यातील अनेक गावात जिओ मोबाईल कंपनीचे ग्राहक मोठ्या संख्येने आहेत. गेल्या आठ, पंधरा दिवसांपासून जिओ कंपनीचे मोबाईल फोन लागत नाहीत, लागला तर नेटवर्क नसल्याने आवाज येत नाही. फोन लावला किंवा आल्यास हँलो,हँलो..करत बसावे लागते आहे. तसेच मोबाईल फोनचे दिवस, दिवस नेटवर्क गायब होते. जिओ कंपनीचे फोन म्हणजे असून होळंबा नसून खोळंबा झाले आहेत. कोणाशीही संपर्क करणे अवघड झाले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सध्या शाळा सुरू नसल्याने व १० ते १२ वीच्याही कला शाखेचे शिक्षण आँनलाईन सुरू आहे. या नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कारण ग्रामीण भागात जिओ कंपनीचे ग्राहक मोठ्या संख्येने आहेत. म्हणून कंपनीने नेटवर्क सुरळीत करुन होणारे नुकसान टाळण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
No comments