Breaking News

खा.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद


बीड जिल्ह्यातील महामार्गांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे दिले आश्वासन ;रस्त्यांचे प्रश्न लागणार मार्गी

बीडच्या सर्व्हिस रोडसह वडवणी शहरातून जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण करण्याची केली होती मागणी

बीड : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न सोडवण्यासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी दि.१६ डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली होती.याभेटीत त्यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या समस्या मांडून विविध मागण्यांचे पत्र त्यांना दिले होते.खा.प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या मागण्यांना नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून बीड जिल्ह्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न आपण प्राधान्याने सोडविणार असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे.

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या नगर-बीड आणि सौताडा-बीड मार्गाची प्रचंड दुर्दशा झाली आहे. या मार्गातील खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असून रस्ता दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.यासंदर्भात खा.मुंडे यांनी सदरील रस्त्याच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याची मागणी नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.


तसेच वडवणी शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण करणे आणि रस्त्यांमध्ये दुभाजक बसवने आवश्यक असल्याचे देखील त्यांनी नमूद केले होते.यासोबतच धुळे-सोलापूर महामार्गावरून परळीकडे जाण्यासाठी व औरंगाबाद सोलापूरकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोडची आवश्यकता मांडताना सदरील राष्ट्रीय महामार्गावरून सर्व्हिस रोड करण्याच्या सूचना संबंधितांना देण्याची मागणी त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.

बीड जिल्ह्यातील नागरीकांची गैरसोय रोखण्यासाठी नितीन गडकरी यांनी देखील खा.प्रितमताईंच्या मागण्यांना तात्काळ प्रतिसाद दिला असून रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतःयामध्ये लक्ष घालणार असल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे.


नितीन गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद आणि खा.प्रितमताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या समस्या मार्गी लागतील असा विश्वास सर्वसामान्यांमधून व्यक्त केला जातो आहे.No comments