Breaking News

ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा दुर्गप्रेमी यांनी अवघड टेहाळणी बुरुजाची स्वच्छता मोहीम फत्ते


टेहाळणी बुरुजाने झाडापासून घेतला मोकळा श्वास 

किल्ले धारूर :  शहरातील ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यात टेहळणी बुरुजावर वडाचे झाडाने बराच भाग व्यापून टाकलेला होता. गेल्यावर्षी किल्ले धारुर युथ क्लब व राजा शिवछत्रपती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्वच्छता अभियानामध्ये राजा शिवछत्रपती परिवारच्या मावळ्यांनी त्यांनी बुरुजावरील वडाच्या झाड काढले होते. परत जोमाने वड वाढला होता. भविष्यात ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यातील मुख्य प्रवेशद्वारासमोरच समोरील टेहाळणी बुरुज ढासळला असता.हा धोका ओळखून सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार तथा गडदुर्ग प्रेमी यांनी अवघड टेहाळणी बुरुजाची नुकसानदायक झाडे काढून त्या ठिकाण ची स्वच्छता मोहीम फत्ते केली.

     

ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यातील ढासळलेल्या तटबंदीचे पुर्नबांधकाम चालू आहे हे पाहणी करत असताना किल्ले धारूर पत्रकार संघाचे सचिव तथा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अतुल शिनगारे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिलजी महाजन, पत्रकार ईश्वर खामकर, पत्रकार नाथा ढगे सर, पत्रकार रवि गायसमुद्रे, पत्रकार सतिष पोतदार, पत्रकार अतिक मोमिन या पत्रकार बंधूंनी हे वडाचे झाड काढणे बाबत भविष्यात टेहाळणी बुरुज ढासळला जाऊ नये यासाठी वर्तमानपत्रातून आव्हान केले होते.

     

हे आव्हान कायकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा किल्ले धारुर युथ क्लबचे सदस्य तथा किल्ले धारुर पत्रकार संघाचे सदस्य दिनेशजी कापसे यांनी हे आव्हान स्विकारले. दिनेशजी कापसे यांनी सर्व सुरक्षा साधनांचा वापर केला या मध्ये झुलती शिडी, सेफ्टी बेल्ट, विळा, कुराड, पार व कत्तीच्या साह्याने व पुरातत्व विभागाचे नियमाचे पालन करत ही स्वच्छता मोहीम पूर्ण केली. 

     

किल्ले धारुर पत्रकार संघाचे सचिव अतुल शिनगारे, यांनी झुलत्या शिडीवरून बुरुजावर ट्रेकिंग केली. आपले सदस्य बुरुजावर जाऊन स्वच्छता करत असलेले पाहिल्यावर किल्ले धारुर युथ क्लबचे अध्यक्ष सुरेश शिनगारे यांनी टेहळणी बुरुजावर झुलत्या शिडीच्या आधार घेत वडाच्या फांद्या काढण्यात सहभाग घेतला. हे काम धोक्याचे होते परंतु कौशल्य वापरत टेहळणी बुरजावर आज सकाळी तीन ते चार तास त्यांनी वडाचे झाड, इतर झाडे व वनस्पती काढण्यासाठी वेळ लागला. एका आव्हाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने ऐतिहासिक महादुर्ग किल्ला स्वच्छ करण्यासाठी युवकांच्या कार्यातून टेहळणी बुरुजाने मोकळा श्वास घेतला.

     

आज बुरुजावरील वडाचे झाड काढण्यासाठी सहकार्य करण्यासाठी जलदुत विजय शिनगारे किल्लेधारूर शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब कुरूंद, ज्येष्ठ पत्रकार शाकेर सय्यद,कायकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पत्रकार  दिनेश कापसे युथ क्लब अध्यक्ष सुरेश शिनगारे, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अतुल शिनगारे, पुरातत्व विभागाचे कर्मचारी नितीन चारुडे साहेब, किल्लेदार कपिल समर्थ यांनी उपस्थित राहुन या कार्यात सहभाग घेतला.

No comments