Breaking News

नोंदणी केलेल्या शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीस आणावा - सभापती संभाजी शेजुळ


बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी बाजार समिती कार्यालयांमध्ये नोंदणी केलेली आहे तरी नोंदणी केलेल्या शेतकरी बांधवांना बाजार समितीमार्फत मेसेज द्वारे कापूस घेऊन यावे असा मेसेज पाठवल्या नंतरच एफ. ए.क्यू दर्जाचा कापूस विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांनी केले आहे.

     

 तसेच आज दिनांक 3-12-2020 रोजी मोरेश्वर जिनिंग अँड प्रेसिंग येथे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ होणार आहे तरी शेतकरी बांधवांनी बाजार समितीमार्फत मेसेज आल्यानंतरच टीएमसी आवारामध्ये कापूस आणून रीतसर टोकन घेऊन जिनिंगवर मापासाठी जावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ व सचिव एच. एन. सवणे  यांनी केले आहे.


No comments