Breaking News

केजचे नायब तहसीलदार सुहास हजारे यांचा रिपाइंच्या वतीने सत्कार

गौतम बचुटे । केज  

येथे नायब तहसीलदार म्हणून रुजू झालेले नायब तहसीलदार सुहास हजारे यांचा रिपाइं (ए) च्या वतीने सत्कार करण्यात आला.

केज येथे नायब तहसीलदार पदी गेवराई येथून बदली होऊन आलेले सुहास हजारे यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार म्हणून पदभार स्विकारला आहे. त्या निमीत्त रिपाइं (ए) च्या वतीने तालुका उपाध्यक्ष रविंद्र जोगदंड, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे व कैलास वाघमारे यांनी त्यांच्या कार्यालयात शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी मन्मथ पटणे व पठाण हे उपस्थित होते. या वेळी नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी  जिल्हाधिकारी राहुल रेखावर, उपजिल्हाधिकारी शरद झाडके व तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्या आदेशाने आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पुरवठा विभागाचा कारभार पारदर्शी ठेवण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन केले.
No comments