पाण्यातील विद्युत मोटर काढतांना शाँक लागुन तरुण शेतकऱ्याचा मुत्यु
मोगरा येथील गोदावरी नदीपात्रातील दुर्घटना
बाळासाहेब आडागळे । माजलगाव
शेतीला पाणी देण्यासाठी गोदावरी नदीपात्रात टाकलेली विद्युत मोटर बिघडल्याने विद्युत मोटर काढण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याचा शाँक लागुन मुत्यु झाल्याची दुर्घटना दि ०१ डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली असुन गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील तरुण शेतकरी गजानन मारोतराव शिंदे वय (३०) या शेतकऱ्याची जमीन गोदावरी नदीच्या काठावर असल्याने शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून गोदावरी नदीपात्रात विद्युत मोटर टाकली होती मात्र, दि ०१ डिसेंबर मंगळवार रोजी ३० वर्षिय तरुण शेतकरी गजानन मारोतराव शिंदे हे नदीपात्रातील विद्युत मोटरीत बिघाड झाल्याने विद्युत मोटर काढण्यासाठी गोदावरी नदीपात्रात उतरल्याने नदीपात्रतच शाँक लागल्याने मुत्यु झाल्याची दुर्घटना दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
No comments