Breaking News

फुकटच्या चुना पुड्यांमुळे लोकांच्या डोळ्यांना धोका!


रस्त्यांवर फेकू नका, इतरत्र विल्हेवाट लावा
- शेख मुजीब, शेख समद 

बीड :  गायछाप तंबाखू निर्मात्यांकडून तंबाखू पुडी घेणाऱ्यांना प्रत्येक तंबाखू पुडी सोबत एक चुन्याची पूडी फुकटात देण्यात येत आहे. परंतु तो चुना अत्यंत कडक असल्याची तक्रार तंबाखू खाणारे शौकिन करत असून त्या पुड्यांमधील चुना खाल्ल्याने तोंड येत असल्याचे म्हणत आहेत. 

त्यांच्या या तक्रारीची दखल घेत पान टपरी चालक त्या पुड्या ग्राहकांना न देता तंबाखू पुड्यात आलेल्या त्या पन्नास चुना पुड्यांचे पाकीट चक्क रस्त्यांवर फेकून देत आहेत. यामुळे फेकलेल्या पुड्यांवरून वाहन गेल्यावर त्या फुटून त्यातील चूना जोरात उडून लोकांच्या तोंडावर जात आहे. जर तोंडा ऐवजी हा चुना डोळ्यांत गेला तर डोळ्यांना अपाय होऊ शकतो किंवा अंधत्वही येऊ शकते. तेव्हा ही बाब लक्षात घेता पान टपरी चालकांनी गायछाप तंबाखू सोबत येणाऱ्या फुकटातल्या चुन्याच्या पुड्या रस्त्यांवर न फेकता इतरत्र त्याची विल्हेवाट लावावी. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शेख मुजीब आणि शेख समद यांनी दिलेल्या पत्रकातून केले आहे.


No comments