Breaking News

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गचे काम निकृष्ट झाल्यास शिव संघर्ष ग्रुप आंदोलन करेल : सुरेश पाटोळेबीड : बीड जिल्ह्यात नवीन राष्ट्रीय महामार्ग निकृष्ट दर्जाचा होत आहे. असे निदर्शनास येत असून माती मिश्रित वाळू, सिमेंट वापरून काम केले जात आहे. झालेल्या कामाचा दर्जा निकृष्ट असेल आणि वर्षांतच भेगा पडत असतील तर शिव संघर्ष ग्रुप काम चालू देणार नाही. असे शिव संघर्ष ग्रुप चे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

     

पाटोदा ते नेकनूर दरम्यान गवारी फाट्याजवळ वर्षांतच सिमेंट महामार्गावर भेगा पडल्या आहेत यांची कल्पना एचपीएम कंपनी व्यवस्थापकाला दिली असून आपण बीड जिल्ह्यात जर असा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला. काम करण्याची घाई केली तर शिव संघर्ष ग्रुप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. असेही सुरेश पाटोळे यांनी बोलतांना सांगितले आहे. 

    

शिव संघर्ष ग्रुप चे सुरेश पाटोळे यांनी एचपीएम कंपनीचे व्यवस्थापक निवृत्ती शिंदे व कंपनीशी संपर्क साधून रस्तेकामाची गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. जेणेकरून आपणास दुबार आर्थिक नुकसान होणार नाही. शेवटी राष्ट्रीय महामार्गचा उत्कृष्ट अहवाल आल्यानंतर आपल्याला काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल असेही सुरेश पाटोळे यांनी सांगितले आहे.


No comments