Breaking News

वडवणीत मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन दिन उत्साहात


वडवणी तालुक्यातील पत्रकारांनी वर्धापन दिन "आरोग्य दिन" म्हणून  केला साजरा

जगदीश गोरे । वडवणी

राज्यातील पत्रकारांची 'मातृसंस्था' म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी झाली होती.आज मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन दिन राज्यात "आरोग्य दिन" म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व पत्रकारांचे नेते एस.एम.देशमुख यांनी केले होते. याच धर्तीवर मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या वडवणी तालुका पत्रकार संघाच्या वतीनेही हा वर्धापनदिन डॉ.ए.आर.दोडताले यांच्या आश्विनी हॉस्पीटलमध्ये पत्रकारांची आरोग्य तपासणी करुन साजरा केला.

     यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ, शिवसेनेचे विनायक मुळे, अमोल आंधळे, पोलीस पाटील शिवाजी मस्के, रा.कॉ.चे संतोष पवार, नगरसेवक अस्लम कुरेशी, शेख मुस्तकीम, वडवणी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष जानकीराम उजगरे, तालुका अध्यक्ष बाबुराव जेधे, विनोद जोशी,माजी अध्यक्ष राम लंगे, शेख शरीफ, सचिव अविनाश मुजमुले, ज्ञानेश्वर वाव्हळ, संपादक सतिश वाघमारे, भैय्यासाहेब तांगडे, रामेश्वर गोंडे, लहु खारगे, ज्ञानेश्वर लंगे, जगदीश गोरे, मच्छिंद्र मोरे, बबलु कदम,सुधाकर शिंदे, शेख ताहेर, धनंजय माने, पवन मुंडे, प्रविण नाईकवाडे, विजय हेंद्रे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. याप्रसंगी सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अधिस्विकृती धारक जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर सर्व पत्रकारांची डॉ. ए. आर. दोडताले यांच्या अश्विनी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सर्व पत्रकारांची रक्तदाब, मधुमेह, रक्त, लघवी, ई.सी.जी, एक्स-रे आदि आरोग्य तपासणी करून वडवणी येथे मोठ्या उत्साहात मराठी परिषदेचा 82 वा वर्धापनदिन हा "आरोग्य दिन" म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर ए. आर. दोडताले यांनी हॉस्पीटलच्या वतिने उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल,श्रीफळ,व पुष्प देऊन सन्मान केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार पत्रकार जगदीश गोरे यांनी मानले.


No comments