Breaking News

बारा ग्रामपंचायतसाठी होणार 81 सदस्यांची निवड केवळ पाच दिवसांतच करावा लागणार उमेदवारी अर्ज दाखल

शेख कासम । कडा

तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रीयेसाठी तहसिलदार शारदा दळवी यांनी पाच झोनल अधिकारी आठ निवडणूक निर्णय अधिकारी, आठ निवडणूक निर्णय अधिकारी व एकूण जवळपास 180 कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले असून अर्ज भरण्याच्या पहिल्यादिवशी एकही अर्ज उमेदवाराने दाखल केला नसल्याची माहिती तहसिलदार शारदा दळवी यांनी दिली आहे.


            

आष्टी तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला होणार आहे. यासाठी आज बुधवार दि.23 पासून आनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरवात झाली असून आठ निवडणूक निर्णय अधिकारी व आठ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अशा 16 अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामपंचायतनिहाय निवडण्यात आलेले अधिकारी पुढीलप्रमाणे - धनगरवाडी (पिं.) व पिंपळा - शाखा अभियंता व्ही.जी. निंबाळकर व स्थापत्य अभियंता पोपट भानुदास चव्हाण. सुंबेवाडी व हातोला - शाखा अभियंता एस.एस. मोरे, स्थापत्य अभियंता अस्लम जकीउल्ला बेग. सोलापूरवाडी व खुंटेफळ (पुंडी) - विस्तार अधिकारी एन.एस. राऊत व स्थापत्य अभियंता एस.के. रासकर,. धनगरवाडी (डो) व डोईठाण - शाखा अभियंता शशिकांत चौधरी व कृषि पर्यवेक्षक संतोष रावसाहेब लाळगे. शेरी बुद्रूक व वटणवाडी - विस्तार अधिकारी आय.ए. खान व स्थापत्य अभियंता बी.एस. म्हस्के यांची तसेच शाखा अभियंता आय.ए. खान, स्थापत्य अभियंता बी.आर. उगले, मंडळ कृषि अधिकारी आर. एफ. शिदोरे, कृषि पर्यवेक्षक कल्याण साहेबराव पवार यांची राखीव कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार शारदा दळवी यांनी दिली.
No comments