Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी 15 जानेवारी २०२१ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

            बीड :  11 डिसेंबर 2020 अन्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणा-या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या निवडणूक कार्यक्रमानुसार बीड जिल्हयातील 129 ग्रामपंचायतीसाठी दि. 15 जानेवारी 2021 शुक्रवार रोजी होणार असून तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता 11 तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात 15 जानेवारी 2021 रोजी स्थानिक सुट्टी जाहिर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत. 


            

इतर सर्व आस्थापना व बँक ( यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेली स्थानिक सुट्टी लागू होणार नाही ) त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी/ कर्मचारी यांना मतदान करता येणे शक्य व्हावे यासाठी कामाच्या तासामधून दोन तासाची सवलत देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. 

   
No comments