Breaking News

मागास विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क अर्ज : 15 डिसेंबर पर्यंत पाठवावे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. मडावी यांचं आवाहन

 

बीड :  महाडिबीटी पोर्टलवरील अनु. जाती, विजा, भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे नविन शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी नविन व नूतनीकरण अर्ज दिनांक 03 डिसेंबर 2020 पासून सुरु होत आहे. तरी जिल्हयातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी दिनांक 03 डिसेंबर 2020 पासून सर्व पात्र अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांचे नविन व नूतनीकरण द्वारे भारत सरकार शिष्यवर्ती, शिक्षण शुल्क या योजनेचे आवेदन पत्र भरून महाविद्यालयाद्वारे या कार्यालयास मंजूरीसाठी पाठवावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केलं आहे.

दिनांक 03 डिसेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020 या कालावधी मध्ये ही कार्यवाही करावयाची आहे. आणि सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे 100% आवेदनपत्र भरुन या कार्यालयास मंजूरीसाठी पाठविण्याची कार्यवाही करायची आहे असे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांनी केले आहे.No comments