Breaking News

तिसर्‍या वनडे सामन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव, 'हे' खेळाडू विजयाचे शिल्पकार


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना मनुका ओव्हल मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 302 धावा केल्या.


303 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकांत 289 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांची वनडे मालिका यापूर्वीच आपल्या नावे केली आहे. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे. धवनने 16, शुभमन गिलने 33 विराट कोहलीने 63, अय्यर 19, हार्दिक पांड्याने नाबाद 92 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 66 धावा केल्या. पांड्या आणि रवींद्र जडेजाच्या शानदार डावामुळे भारताने 303 धावांची मजल मारली. विराटने त्याच्या खेळीदरम्यान 5 चौकार लगावले. तर पांड्याने 7 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी जडेजाने 5 चौकार आणि तीन षटकार लगावले.


No comments