Breaking News

पेठबीड मध्ये जुगार अड्यावर धाड : 12 जुगाऱ्याकडून एक लाख 40 हजाराचा मुद्देमाल हस्तगत


स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर धडक कार्यवाही 

गौतम बचुटे । केज 

पेठबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्यावर टाकलेल्या धाडीत १२ जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याचं आढळून आल्यानं त्यांच्याकडून तब्बल १ लाख ४० हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. 

बीड जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक आर. राजा स्वामी यांनी अवैध धंदे करणाऱ्या लोकांची माहिती काढून त्यांचेवर छापे घालून अवैध धंदे बंद करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक,  स्थानिक गुन्हे शाखेला दिलेत. त्यानुसार रविवारी (दि.२०) पेठबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रविवारपेठमध्ये शिवलींग वसंतराव क्षीरसागर हा स्वत : च्या फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदेशीररित्या काही इसमांना एकत्र बसवून त्याच्या मालकीच्या खोलीमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर अचानक त्याठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. 

त्यावेळी शिवलींग वसंतराव क्षीरसागर, गणेश लक्ष्मण गायकवाड, गजेंद्र रामभाऊ गाडे, राजेंद्र सयाजी इनकर, दत्ता रामभाऊ वनवे, शफीक अब्दुल रशीर कुरेशी, महेश प्रल्हाद जोशी, पवन बंडूप्रसाद शर्मा, विष्णु छगनराव कानगावकर, सुनिल भगवान बोचरे, सयाजी मसाजी निर्मळ, हनुमंत मसाजी वाघमारे हे १२ जुगारी तिर्रट खेळत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्यासह एकूण १ लाख ४० हजार ४३० रुपयांच्या मुद्येमालासह त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात पेठबीड पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३२४/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
No comments