Breaking News

अबब.. शेख महंमद दर्ग्याची 103 एकर जमिन हडपली

जमिनीचे बनावट दस्तावेज करून लाटली जमीन डॉ. गणेश ढवळे यांची गृहमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, आयुक्तांकडे तक्रार 


शेख कासम ।  कडा

आष्टी तालुक्यातील मौजे रूईनालकोल येथील शेख महंमद दर्ईग्याची इनामी जमिन सर्वे नंबर 75,76,77,81,81/1, एकुण क्षेत्र 103 एकर जमिन बनावटी, खोटे सही दस्तावेज तयार करून जमिन हस्तांतरण करणा-या महसुल प्रशासन व जमिन खरेदी करणारांवर  गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच  इनामी जमिन पुर्ववत देवस्थानच्या नावे करण्यात यावी यासाठीच डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री,गृहमंत्री, अल्पसंख्याक विकास मंत्री,विभागीय आयुक्त यांना लेखी तक्रार केली आहे.

कसबे रूईनालकोल ता.आष्टी जि.बीड येथील देवस्थानची 103 एक्कर ईनामी जमिन सर्वे नंबर 75,76,77,81अ,81आ मधिल जमीन वंशपरंपरागत 7 कुटूंब प्रमुखाच्या नावे सातबारावर असल्याचे पुरावे उपलब्ध असताना इनामी  देवस्थानची सेवा करत असताना, या जमिनीवर बेकायदेशीर रित्या खोटे  बनावट  दस्तावेज तयार करून शेतकरी नसलेल्या एका शिक्षणसंस्थेत मुख्याध्यापक, प्राध्यापक पदावर असलेल्या ज्यांचा  जमिनीशी काहीही संबंध नसताना मंडळ आधिकारी, तलाठी यांच्याशी संगनमताने आपल्या नावाने  सातबारावर फेरफार करून फसवणूक केली आहे. त्यामुळे संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व हस्तांतरित जमिन देवस्थानच्या नावे हस्तांतरित करण्यात अशी मागणी  डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश यांनी केली आहे. 

अंगठे बहादरांच्या खरेदीखत करताना बाॅण्डवर ऊर्दुत सह्या 

 वंशपरंपरागत देवस्थानची सेवा करत जमिन कसून  पोट भरणारे अशिक्षित अडाणी लोक जे अंगठाबहाद्दर आहेत त्यांच्या खरेदीखतावर ऊर्दुमध्ये सह्या केलेल्या आहेत. बनावट खरेदीखत आदि. तलाठी, मंडळआधिकारी यांच्याशी संगनमताने फसवणूक केली आहे. 

राजकीय नेत्याच्या संस्थेवरील नोकरदार, नोकरीचे आमिष 

 फसवणूक करणारे आष्टीतील राजकीय नेत्याच्या संस्थेवर पदाधिकारी असल्याने नेत्यांनी यांना बोलावून घेऊन  प्रत्येकी 2 एक्कर जमिन व एका कुटुंबप्रमुखास नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तक्रार मागे घ्या असा प्रस्ताव दिला. मात्र मुळ इनामी देवस्थान जमिनीची सेवा करणा-या कुटुंबप्रमुखांनी फेटाळत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार केली आहे.No comments