Breaking News

मराठा आरक्षण परिषदेस उपस्थित राहा - राहुल टेकाळे, राजेंद्र आमटे


मराठा आरक्षण परिषदेच्या गावोगावी भेटी - गाटी बीड :  मराठा समाजाने अनेक मोर्चा, आंदोलन, प्राणाची आहुती देऊन मराठा आरक्षण मिळवून घेतले पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही.आरक्षनावर स्थगिती मिळाली आरक्षणातून नोकरीला लागलेले अनेक जण आज संभ्रमात आहेत, नोकर भरतीसाठी अर्ज खुल्या प्रवर्गातून करावा की कसा करावा या अडचणीत आसताना मराठा विध्यार्थ्यांना अरक्षण संदर्भात जनजागृती संभ्रम दूर  करण्यासाठी आ. विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण विध्यार्थी व युवा परिषदेचे आयोजन दि.05 नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 वाजता सूर्य लॉन्स येथे तरुणाने उपस्थित राहावे या करीत राहुल टेकाळे,राजेंद्र आमटे ,सुरेश खुराने यांनी गावोगावी भेटी देऊन आव्हान केले. 

या वेळी नागपूर, खांडे पारगाव, उमरी, उमरद खालसा, म्हाळसा जवळा, म्हाळसापूर, इट, पिंपळनेर ,भटसंगावी, बऱ्हाणपूर, पारगाव जप्ती, लोळादगाव, कुर्ला या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन राहुल टेकाळे, राजेंद्र आमटे, सुरेश खुराने, गणेश तांबे,बाबासाहेब सिरसाट,युवराज परस्कार,महेश शिंघन,मधुकर आमटे, बापूराव जाधव, विशंभर सपकाळ, शिवाजी झणझने, गोरख डोईफोडे, ज्ञानेश्वर खांडे, शुभम खांडे, गणेश खांडे, मंगेश खांडे, भिभीषण डोईफोडे, विष्णू डोईफोडे, संदीप नरवडे आदीच्या उपस्थित आव्हान करण्यात आले.


No comments