Breaking News

फटाक्यांवर देव-देवतांची चित्रे नसावीत, शिवसेना करणार आंदोलन-राजेश विभुते

 परळी :  हिंदु धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी हा दिव्यांचा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीचा उत्सव असतो, या उत्सवात फटाके उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्रेते बाजारपेठेत दाखल होण्यास सुरूवात झाली असून देव-देवतांची चित्रे असलेली फटाके परळी शहरात विक्री करण्यास मज्जाव करावा अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने त्यास उत्तर देईल असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश विभुते यांनी दिला.

परळी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश विभुते व पदाधिकारी व सदस्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  देव-देवतांची चित्र असलेली फटाके विक्री करणाऱ्यावर महसुल प्रशासनाने निर्बंध घालावीत अशी मागणी केली आहे. मागील काही वर्षापासून फटाक्यांवर देव-देवतांची चित्रे छापली जातात. हे फटाके फोडल्यानंतर चित्र पर्यायाने देव-देवतांचा अवमान होत असून शिवसेना अशा कोणत्याही घटनेला थारा देणार नाही असा इशारा विभुते यांनी दिला आहे. 

दरम्यान परळी शहरात अशा प्रकारची फटाके विक्री होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तहसील प्रशासनाची राहणार असून विक्री न थांबल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
No comments