Breaking News

ख्रिश्चन समाजाला अच्छे दिन अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या पाठपूराव्याला मोठे यश


ना.नवाब मलिक यांनी मंञालयातील बैठकीत ख्रिश्चन समाजाच्या आठ मागण्या केल्या मान्य

मुंबई :  अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे महाराष्ट्रातील पदाधीकारी यांच्या समवेत मंञालयात अल्पसंख्खाक मंञी ना.नबाव मलिक यांनी बैठक आयोजित केली होती व त्यात ख्रिश्चन समाजाच्या अडीअडचणी मागण्या वर जवळपास एक तास बैठक चालली ख्रिश्चन समाजाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी महाराष्ट्रातील शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.याप्रसंगी नवाब मलिक यांनी ख्रिश्चन समाजाच्या पाठीमागे अल्पसंख्खाक मंञालय खंबीरपणे उभे आहे.तात्काळ आपल्या आठ मागण्या आम्ही मान्य करीत आहोत, असे मंत्री मलिक म्हणाले. अशी माहिती आशिष शिंदे यांनी दिली. 

या मान्य केल्या मागण्या

1)जिल्हा अल्पसंख्खाक संनियंञण समिती वर एक ख्रिश्चन सदस्य घेणार.

2)अल्पसंख्खाक आयोग व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळावर ख्रिश्चन समाजास प्रतिनिधित्व मिळणार

3)मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातील   सर्व योजनाचा लाभ ख्रिश्चन समाजास देणार व लोकसंख्खे प्रमाणे वित्त वाटपाचे नियोजन करणार.

4)शासनाच्या वतीने पंडिता रमाबाई यांच्या राज्य पुरस्कार सूरू करणार.

5)जुन्या चर्चच्या संवर्धनासाठी तिर्थक्षेञ विकास निधीतून अर्थसाह्य करणार.

6) नविन ख्रिश्चन धर्मगुरूना तात्काळ विवाह लावण्याचा परवाना मिळणार व तो विभाग आरोग्य मंञालया कडून अल्पसंख्खाक मंञालया कडे आणणार.

7)महाराष्ट्रातील सर्व ख्रिश्चन कब्रस्थानाला संरक्षक भिंत बांधून त्यावरील अतिक्रमण हटविणार व सोयी सुविधा पूरविणार.

8) ख्रिश्चन संस्थेस अल्पसंख्खाक दर्जा प्रमाणपञ तात्काळ देणार.

अशा आठ मागण्या मान्य करण्यात येत असून त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश ना.नवाब मलिक यांनी अल्पसंख्खाक विभागाचे सचिव व इतर अधिकारी यांना दिले.यावेळी बोलताना ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी या बैठकीतील निर्णया बद्दल आनंद व्यक्त केला व अनेक दिवसा पासून अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ यासाठी शासन दरबारी पाठपूरावा करीत होते शेवटी आज मागण्या मान्य झालेल्या आहेत.त्याबद्दल ख्रिश्चन समाजाच्या वतीने ना.नवाब मलिक यांचे आभार मानले.

यावेळी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी प्रदेशअध्यक्ष आशिष शिंदे, राज्य उपाध्यक्ष राजेश थोरात,मुंबई अध्यक्ष राज एडके,बिशप सँम्युअल साखरपेकेकर,रेव्ह.सुनिल मंतोडे,हम भारतीय पक्ष अध्यक्ष अँण्ड्रू फर्नांडीस,आँगस्टिन गायकवाड,आजिंक्य लोंढे,अँन्थोनी वाकडे,मयुर पाटोळे,मधुकर भालेराव व रमाकांत सिंग हे उपस्थित होते.


No comments