जमिनीच्या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्णयास अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती
गौतम बचुटे । केज
तालुक्यातील साळेगाव येथील जमीनीच्या प्रकरणी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाला अप्पर जिल्हाधिकारी यांनी स्थगिती देत अर्जदार यांचा अर्ज मंजूर केला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील सुमनबाई राणू बचुटे आणि इतर पाच नातेवाईकांनी पंचफुला ओव्हाळ व इतर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम नुसार क्र. २४२७ प्रमाणे साळेगाव येथील वारसा आधारे नोंदविण्यात आलेला फेरफार क्र. ३९५८ दि. ८ जानेवारी २०१८ बाबत उपविभागीय अधिकारी यांचे निर्णय संचिका २०१९/ आर ओ आर/बिडी ३५/ दि. १७ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेल्या निर्णयाच्या नाराजीने त्यांनी दि. ८ सप्टेंबर रोजी अपील दाखल केले होते. अपिलात त्यांनी फेरफार क्र. ३९५८ अमंलबजावणी व मूळ अपिलाचा निर्णय लागे पर्यंत ७/१२ ला बदल करू नये. अशी विनंती केली होती. तसेच वादींनी जमीन महसूल अधिनियम दावा क्र. ४४८/२०१७ मधील निकाल हा वाटणी बाबत आहे. असा युक्तिवाद वादींच्या वकील अँड. एम एल जाधव यांनी केला.
या सर्व बाबींचा विचार करून मा. अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी दि.१७ फेब्रुवारी रोजी मा. उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देत वादींचा अर्ज मंजूर केला आहे.
No comments