Breaking News

औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी रमेश पोकळेच उमेदवार योग्य-वैजनाथ मिसाळ
शिरूर कासार : 
शालेय जिवनापासुन विद्यार्थ्याच्या व नंतर सर्वसामान्यांच्या प्रेमात पडलेले भाजपचे लोकप्रिय नेते रमेश पोकळे हे असुन  होत असलेल्या औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत भाजपाने त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपचे जि प सदस्य वैजिनाथ मिसाळ यांनी केली आहे.

रमेश पोकळे यांना विद्यार्थी, विद्यापीठ क्षेत्र, व पदवीधर यांची मोठी जाण असुन गेली विस ते पंचवीस  वर्षांपासून मोठे त्यांचे योगदान आहे सतत मानसातला मानुस म्हटले तर पोकळे यांना मानले जाते औरंगाबाद विभागात सिनेट चे पदाधिकारी असताना मराठवाड्यातील अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे विकासात्मक कामे केलेली आहेत.

तरूणांना हवाहवासा वाटणारा हा नेता आमदार व्हावा अशी अपेक्षा हजारो तरूण पदवीधर व जुनी जाणती पदवीधर मंडळी व्यक्त असुन भाजपाने होणार असलेल्या या निवडणुकीत भाजपाचा लोकप्रिय असलेल्या कणखर नेता रमेश पोकळे हे उमेदवार साठी योग्य असुन त्यांना उमेदवारी द्यावीअशी  मागणी जि प सदस्य वैजिनाथ मिसाळ यांनी केली आहे.No comments