Breaking News

शेतातील रस्त्याच्या मधोमध उभारले विद्युत खांब, रहदारीस अडथळा : शेतकऱ्याची तहसीलदार यांच्याकडे तक्रार


गौतम बचुटे ।  केज 

तालुक्यातील आनेगाव शिवारात शेतकऱ्याच्या वहिवाटीच्या रस्त्याच्या मधोमध वीजेचे खांब उभे करून अडथळा निर्माण केल्याची तक्रार शेतकऱ्याने तहसीलदार आणि वीज वितरण कार्यालयाकडे केली आहे. 

या बाबतची माहिती अशी की केज तालुक्यातील धनेगाव येथील माणिक पोटभरे या शेतकऱ्याची आनेगाव शिवारात जमीन असून या भागात एका शेतकऱ्यांना वीज पुरवठा देत असताना अनुसूचित जातीचे शेतकरी माणिक पोटभरे यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध वीजपुरवठ्याचे विद्युत खांब उभे केले आहेत. या बाबत सदर शेतकऱ्याने विरोध करूनही वीज वितरणचे कर्मचारी, अधिकारी आणि गुत्तेदार यांनी न जुमानता हे खांब उभे केले आहेत. अद्याप त्यावर वीज पुरवठ्याचे तार बसवलेली नाही. या बाबत माणिक पोटभरे या शेतकऱ्याने तहसीलदार आणि वीज वितरण कंपनीच्या केज व युसुफ वडगाव येथील कार्यालयात लेखी तक्रार देऊन हे खांब काढून इतर ठिकाणी लावण्याचे विनंती केली आहे.No comments