Breaking News

विद्यार्थी व युवकांनो आम्ही परिषदेला येत आहोत आपणही या" ...

बिभीषण कदम, ओंकार घुमरे, ओंकार पाटील, जयसिंह काकडे, वैभव प्रभाळे यांचे आवाहन  


बीड :  मराठा आरक्षण, समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला जाग यावी तसेच विद्यार्थी-युवकांना आरक्षण प्रक्रियेची क्लिष्ट असणारी कायदेशीर माहिती मिळावी,संभ्रम दूर व्हावेत, विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया, युवकांसाठीच्या योजना आदींबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी  राज्यात पहिल्यांदाच आपल्या बीड जिल्ह्यात "मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेचे" आयोजन मराठा विद्यार्थी व युवकांच्या वतीने करण्यात येत आहे. याचे मुख्य मार्गदर्शक आ विनायक मेटे हे असणार आहेत. तर गायकवाड आयोगाचे माजी सदस्य श्री निमसे व सर्वोच्च न्यायालयातील वकील श्री पिंगळे, करांडे तसेच सिए बी बी जाधव, प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे यांची उपस्थिती असणार आहे.
     

या परिषदेसाठी सुधीर काकडे, अशोक सुखवसे, राहुल टेकाळे, मुकुंद गोरे, ऍड शशिकांत सावंत, ऍड योगेश शेळके, ऍड गणेश मस्के, ऍड योगेश टेकाडे, सोमनाथ मोटे, अजय शिंदे(वडवणी), महारुद्र जाधव हे समाजातील निमंत्रक पुढाकार घेत आहेत. 'मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेचे' आयोजन बीड शहरातील सूर्या लॉन्स येथे दि ०५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. सम्पुर्ण बीड जिल्ह्यातून या परिषदेसाठी मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक - युवती उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या परिषदेत मराठा आरक्षण, सर्वोच्च न्यायालयातील लढा, राज्य सरकारची भूमिका आदी बाबत चर्चा व माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. यासाठी आरक्षणातील अभ्यासक, तज्ञ, वकील व आरक्षण चळवळीतील अभ्यासकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. आम्ही येत आहोत आपणही या असे आवाहन बिभीषण कदम, ओंकार घुमरे, ओंकार पाटील, जयसिंह काकडे, वैभव प्रभाळे यांनी केले आहे.


No comments