Breaking News

आष्टी तालुक्यातील वाघळुज लमाणतांडा २५ वर्षापासून तहानलेलाच

के. के. निकाळजे । आष्टी 

आष्टी तालुक्यातील अहमदनगर - बीड राज्य महामार्गावर असलेले वाघळूज लमाणतांडा येथील नागरिक गेल्या २५ वर्षापासून पिण्याचे पाणी विकत घेत आहेत.या गंभीर आणि जिव्हाळ्याच्या  पाणी प्रश्नाकडे प्रशासन व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. अद्याप हा प्रश्न सुटला नाही. प्रशासनाने या गंभीर प्रश्नावर तात्काळ लक्ष द्यावे व पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रा.पं. सदस्य समीर जाठोत यांनी केली आहे.

शासनाने वसंतराव नाईक तांडा सुधारणा योजनेअंतर्गत लमाणतांडा विकासासाठी कोट्यावधी रु दिलेले आहेत माञ आष्टी तालुक्यातील हा वाघळुज लमाणतांडा २५ वर्षापासुन तहानलेलाच आहे.आष्टी तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण भरपूर असून सर्वत्र पाणी साठवण मोठ्या प्रमाणात केलेले आहे.नदी, ओढे ,तलाव पाण्याने भरलेले आहेत .सर्वत्र पाणी उपलब्ध असतानाही या लमाणतांड्यासाठी कसल्याही प्रकारची पिण्याचे पाणी पुरवठा करणारी योजना नसल्याने येथील रहिवासी यांना पाणी उपलब्ध असतानाही फक्त योजना नसल्याने आजही पाणी विकत घ्यावे लागत आहे.

फक्त दुष्काळ परिस्थितीमध्ये शासनाने पाणीटंचाई निवारण्यासाठी मंजूर केलेल्या टँकर सुरु असतानाच नागरिकांना गढूळ आणि गाळमिश्रीत  पाणी उपलब्ध होते.पाणी पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत होते.आज गेल्या पंचवीस वर्षापासून वाघळुज तांड्यावरील  जनता पिण्याचे पाणी विकत घेत असल्याने त्या ठिकाणी प्रशासनाने पाणीपुरवठा योजना करून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सदस्य समीर जाठोत यांच्यासह वाघळुज लमाणतांडा नागरिकांनी केली आहे.No comments