Breaking News

नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्या कडून पाळवदे कुटुंबियांचे सांत्वन


माणिकराव पाळवदे हे एक शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले - नगरसेवक प्रा.पवन मुंडे 

परळी वैजनाथ :  हेळंब येथील माजी उपसरपंच माणिकराव पाळवदे यांच्या दुःखद निधनाबद्दल भाजपाचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे सर यांनी हेळंब येथील निवास्थानी भेट देऊन पाळवदे कुटुंबियांची त्यांचे सांत्वन केले. एक शांत, संयमी, अभ्यासू व परिवारातील ज्येष्ठ सदस्याला आपण मुकलो आहोत अशी प्रतिक्रिया नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी दिली.

            

परळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील जेष्ठ राजकिय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीमत्व माजी उपसरपंच तथा सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांचे (92) व्यावर्षी दि.27 आँक्टोंबर रोजी निधन झाले होते. परळी तालुक्यातील सर्व परिचित असणारे व्यक्तीमत्व माणिकराव पाळवदे यांची दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून आपल्याला तीव्र दुःख झाल्याचे व्यक्त करत नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  त्यांनी आपल्या वागण्यातून मोठेपणा अथवा अधिकार कधी गाजवला नाही. दादांची साधी राहणी, शांत स्वभाव, संयमी वृत्ती यामुळे ते सर्वांना जवळचे वाटायचे. त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम केले. 

हेळंब व परिसरात तसेच ग्रामीण भागातील सर्वापरिचित व्यक्तिमत्व हरपले असून  त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील असे नगरसेवक प्रा.पवन मुंडे सर म्हणाले.  मुंडे व पाळवदे कुटुंबिक स्नेह तर होताच शिवाय ते नातेवाईकही होते. एक शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची  ओळख होती. आमचा परिवार त्यांच्या दुःखात मनापासून सहभागी आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशा शब्दांत नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

                  

यावेळी नगरसेवक प्रा.पवन मुंडे सर यांच्यासह संदिप मुंडे, माजी सरपंच बालाजी आंधळे, गोवर्धन आंधळे, रामेश्वर आंधळे,  श्यामकरण चाटे, पत्रकार महादेव गित्ते, केशंव गित्ते, इतर नागरिक यांच्यासह पाळवदे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विठ्ठलराव आंधळे, प्रा.नारायण पाळवदे, प्रा.डॉ.नागोराव पाळवदे, हेळंबचे उपसरपंच राम पाळवदे , काशिनाथ पाळवदे दत्ता पाळवदे  रोहन पाळवदे विठ्ठल पाळवदे व पाळवदे परिवार उपस्थित होते.No comments