Breaking News

समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने कोविड योद्द्यांचा सत्कार


 

गौतम बचुटे । केज 

समर्थ प्रतिष्ठान केज यांच्या वतीने केज येथे कोरोना केंद्रात कार्यरत असलेले कोरोना योद्द्यांचा सत्कार करण्यात आला.

केज तालुक्यातील समर्थ प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकार गौतम बचुटे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले डॉ. अस्वले, डॉ. चाटे, पत्रकार धनंजय कुलकर्णी, श्रीराम शेटे, श्रीकृष्ण नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज मुथळे, उपाध्यक्ष गणेश काळे आणि सचिव शैला शेटे याही उपस्थितीत होत्या. या वेळी सर्व कोरोना योद्यांचा प्रशस्ती पत्र व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  

प्रमुख पाहुणे डॉ. विकास आठवले यांनी कोरोना आजार संदर्भात घ्यावयाची काळजी. तसेच कोरोना केंद्रामध्ये काम करणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, टेक्निशियन त्याच बरोबर सुरक्षारक्षक यांचा देखील या कार्यात मोलाचा वाटा असून त्यांनी आपल्या त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार गौतम बचुटे यांनी कोरोना संदर्भात जनतेने घ्यावयाची काळजी व त्याबाबत बाळगावयाची सावधानता या विषयी माहिती दिली. तर पत्रकार धनंजय कुलकर्णी यांनी कोरोना योद्द्यांच्या कार्याचा गौरव करून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक असून त्यासाठी माध्यमांनी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाला डॉ. विवेक बचुटे, डॉ. तारळकर, जय जोगदंड, आकाश घाटुळे, घुले, राजाभाऊ ढाकणे यांच्यासह सर्व कर्मचारी व संयोजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक काळे यांनी तर आभार श्रीकृष्ण नागरगोजे यांनी व्यक्त केले.No comments