Breaking News

आमदारकीच्या बारा वर्षात मराठा समाजाचे व पदवीधरांचे कुठलेही प्रश्न न सोडविणाऱ्या उमेदवाराला पदवीधरांनो तुम्ही निवडून देणार का?संभाजी ब्रिगेडचे प्रवीण ठोंबरे,  देवराव लुगडे महाराज यांचा सवाल

परळी : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत सलग बारा वर्षे आमदार की मिरवणाऱ्या व स्वतः उद्योजक असणाऱ्या  पदवीधरांसाठी कुठलेही ठोस काम न करणाऱ्या  उमेदवाराला पुन्हा निवडून देणार का ,?असा सवाल बीड जिल्ह्यातील पदवीधरांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे  व संभाजी ब्रिगेड  तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी केला आहे.

सध्या होऊ घातलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत जे उमेदवार आहेत. त्यामध्ये मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे चालू आमदार हे सलग बारा वर्षे मराठवाडा पदवीधरांचे नेतृत्व करत आहेत. मराठवाडा हा चार-पाच वर्षे दुष्काळी भाग बनला आहे. या दरम्यान बऱ्याच तरुणांना शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी तर मिळाली नाहीच उलट मराठवाड्यात जास्त प्रमाणात पदवी घेतलेले हे शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत. या तरूणांसाठी विधानसभेत किंवा विधानसभेच्या बाहेर  आवाज उठवणे गरजेचे असताना चालू आमदारांनी  कधीही पदवीधरांसाठी कुठलेही योगदान दिलेले नाही अशा उमेदवाराला पुन्हा  संधी न देण्याचे  आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. 

तसेच मराठा समाजाचा महत्त्वाच्या आरक्षण साठी सुद्धा त्यांनी कुठलेही योगदान दिलेले नसून अशा  उमेदवारांला पुन्हा मराठा समाजातील पदवीधरांनी संधी न देता घरी बसविण्याचे काम  करावे .असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे व  संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी केले आहे.
No comments