Breaking News

घरकुलांचे थकलेले हप्ते नगरपरिषदेने लाभार्थ्यांना द्यावेत, अन्यथा शिवसंग्राम नगरपरिषदेसमोर ठिय्या मांडणार


शिवसंग्रामकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन 

बीड :  गेल्या कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगरपरिषदेकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार मागणी करूनदेखील आश्वासनाशिवाय दुसरे काहीही शहरातील लाभार्थ्यांच्या हातावर पडत नाही. पुढच्या आठवड्यात, महिन्यात असेच आश्वासने लाभार्थ्यांना मिळत असल्याने या लाभार्थ्यांनी शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांच्याकडे याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली आहे. दि २० नोव्हेंबर रोजी शिवसंग्रामच्या अशोक ढोले यांच्यासह हप्ते थकीत असलेल्या लाभार्थ्यांनी एकत्रितरित्या नगरपरिषद कार्यालय गाठून जाब विचारला. यावेळी शिवसंग्रामचे शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सातीराम ढोले यांचीही उपस्थिती होती. 

    

येत्या १० दिवसांत थकलेल्या हप्त्यांबाबत नगरपरिषद प्रशासनाने निर्णय घ्यावा. नगरपरिषदेतील अधिकारी - कर्मचाऱ्यांनी आश्वासनांची भडीमार करण्यापेक्षा हप्त्याची रक्कम खात्यावर वर्ग करावी.  अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे.१० दिवसांत जर याबाबत निर्णय घेतला गेला नाही ते शिवसंग्राम नगरपरिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही शिवसंग्रामकडून देण्यात आलेला आहे. यावेळी वरील पदाधिकाऱ्यांसह दत्ता चव्हाण, हनुमंत खरवडे, दत्ता ननवरे, निर्मला वर्पे, अहिरे पंकज, ललित दुधाळ, पांडुरंग चव्हाण आदी थकीत असलेल्या लाभार्थ्यांची निवेदन देतेवेळी उपस्थिती होती.


No comments