Breaking News

परळीत बुधवारी ना.धनंजय मुंडे, संजय दौंड यांच्या उपस्थितीत सतीश चव्हाणांच्या प्रचारार्थ सहविचार सभेचे आयोजन

 


परळी : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळीस आता सुरुवात झाली असून, परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आ. संजय दौंड यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सहविचार सभा व पदवीधर मेळाव्याचे बुधवारी (दि. ११) आयोजन केले आहे.

आ. चव्हाण यांची ही तिसरी निवडणूक असून, त्यांच्या विजयी हॅट्ट्रिक मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी व्यक्त केला आहे.   

त्याअनुषंगाने दि. ११ नोव्हेम्बर बुधवार रोजी परळी येथील हालगे गार्डन मंगल कार्यालय येथे दुपारी ४.०० वा सहविचार सभा व पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, आ. संजय दौंड, आ. सतीश चव्हाण यांसह महाविकास आघाडी व मित्रपक्षातील नेतेगण संबोधित करणार असून, परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जि. प.सदस्य, पं. स.सदस्य, नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख, डॉक्टर्स, वकील, शिक्षक तसेच पदवीधर बंधू भगिनींनी कोविड विषयक नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन परळी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments